Ad will apear here
Next
पूना हॉटेलिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरण शेट्टी
नवी कार्यकारी समिती

पुणे :
पूना हॉटेलिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी २०१९-२०२० या वर्षासाठी शरण शेट्टी यांची निवड झाली आहे. हॉटेल वेस्टिन येथे झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेट्टी यांची निवड करण्यात आली. 

शरण शेट्टी म्हणाले, ‘या वर्षी अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सदस्यांचा आभारी आहे. गेल्या वर्षी नीरव पंचमिया यांच्या अध्यक्षतेखाली अनेक उपक्रम राबवण्यात आले. प्रादेशिक संघटनांसह सरकारशी समन्वय साधून, या क्षेत्राच्या विविध अडचणी दूर करण्याबाबत पूना हॉटेलिअर्स असोसिएशन महाराष्ट्रात सक्रियपणे कार्यरत आहे. या वर्षी आम्ही सदस्यांसाठी चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग यांसह क्रिकेट स्पर्धांसारखे उपक्रम आखले आहेत.’

२०१९-२० या वर्षासाठी संघटनेच्या कार्यकारी समितीची निवडही या वेळी करण्यात आली. मानद सचिव सुरेश तलेरा, माजी अध्यक्ष नीरव पंचमिया, वरीष्ठ उपाध्यक्ष प्रतीक रे, उपाध्यक्ष नासिर शेख, सचिव आदित्य मल्ला, सचिव श्रीनिवास चाफळकर, संयुक्त सचिव विनित मिश्रा आणि महासचिव प्राप्ती देशपांडे यांचा त्यात समावेश आहे.

पूना हॉटेलिअर्स असोसिएशन ही पश्चिम भारतातील हॉटेल उद्योग क्षेत्रातील सर्वांत सक्रिय संघटना असून, पुण्यातील ६८पेक्षा अधिक हॉटेल्सचा त्यात समावेश आहे. दर महिन्याला सदस्यांची बैठक घेणे, त्यात अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घडवणे असे विविध उपक्रम संघटनेतर्फे राबवले जातात. यामध्ये प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असल्याने संघटना भक्कम होण्यास मदत होते, तसेच सदस्यांच्या ज्ञानात भर पडते. सदस्यांना काही अडचणी आल्यास त्या दूर करता येतात.

या क्षेत्राच्या वाढीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हा महत्त्वाचा घटक आहे, यावर पूना हॉटेलिअर्स असोसिएशनचा विश्वास आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे, चर्चासत्रे आयोजित केली जातात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZYECG
Similar Posts
‘पानिपत’च्या कलाकारांनी पाहिले चित्रपटासाठी घडविलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन पुणे : बहुचर्चित पानिपत या ऐतिहासिक चित्रपटासाठी पुण्यातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ने आठशेपेक्षा जास्त प्रकारचे दागिने घडवले आहेत. या चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या औंध येथील दालनाला भेट दिली. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, कृति सेनन आणि सुनीता गोवारीकर यांचा समावेश होता
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘घे भरारी’तून मिळणार व्यावसायिकांना बळ पुणे : ‘व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोल्डन ट्युलिप इव्हेंट्स’च्या वतीने ‘घे भरारी’ या तीन दिवसीय फन-फूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language